राहुल गांधींविरोधात न्यायालयात तक्रार

By Admin | Updated: October 10, 2016 04:43 IST2016-10-10T04:43:48+5:302016-10-10T04:43:48+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून ‘दलाली’ शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

Complaint against Rahul Gandhi in court | राहुल गांधींविरोधात न्यायालयात तक्रार

राहुल गांधींविरोधात न्यायालयात तक्रार

चंदौली (उत्तर प्रदेश) : पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून ‘दलाली’ शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर येथील न्यायालयात बदनामीची तक्रार दाखल झाली आहे.
स्थानिक वकील सदानंद सिंह यांनी कलम ५०० अन्वये (बदनामीसाठी शिक्षा) न्यायालयात हा अर्ज केला. त्यावर २५ आॅक्टोबर रोजी सुनावणी होईल. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांबाबत वापरलेल्या ‘दलाली’ या शब्दामुळे मी आणि देशाचे नागरिक कमालीचे दुखावलो गेलो आहोत, असे सिंह यांनी या अर्जात म्हटले. (वृत्तसंस्था)

Web Title: Complaint against Rahul Gandhi in court