लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या समर्थकांनी शनिवारी घरोघर जाऊन प्रचार करताना कोरोनाच्या आचारसंहितेचे पालन केलेले नाही, अशी तक्रार केली आहे. कैरानात गल्ल्यांमध्ये अमित शहा यांनी घरोघर जाऊन संपर्क केला, तेव्हा १० लोक नव्हे, तर अनेकपट संख्येत होते, असा आरोप सपाने तक्रारीत केला.
अमित शहांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 06:50 IST