शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जमावाकडून होणाऱ्या हत्यांसाठी भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:30 IST

देशात कोणत्याही कारणावरून संशयितास जमावाकडून मारहाण वा हत्येच्या करण्याच्या घटना होता कामा नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना मंगळवारी बजावले.

नवी दिल्ली : देशात कोणत्याही कारणावरून संशयितास जमावाकडून मारहाण वा हत्येच्या करण्याच्या घटना होता कामा नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना मंगळवारी बजावले. या घटना रोखण्यासाठी व घटना घडलीच तर विनाविलंब खटला चालवून गुन्हेगारांना जरब बसेल अशी शिक्षा देण्यासाठी काय करावे याचे सविस्तर निर्देशही दिले. यात हलगर्जीपणा करणाºयांना खातेनिहायच नव्हे, तर फौजदारी कारवाई करून अद्दल घडवावी, असेही सांगितले.हे खटले जलदगती न्यायालयात शक्यतो सहा महिन्यांत निकाली काढणे, पीडितांच्या कुटुंबियांना भरपाईसाठी विशेष निधी, आरोपींचा जामीन, आरोपनिश्चिती, आरोपमुक्ती किंवा शिक्षा अशा प्रत्येक टप्प्यास पीडिताचे म्हणणे लेखी सादर करण्याची मुभा देणे आणि समाजमाध्यमांतून अफवा, असत्य वा प्रक्षोभक माहिती पसरविणाºयांवर तात्काळ बडगा उगारणे आदी निर्देश देण्यात आले आहेत.>प्रतिबंधक उपायप्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक हुद्द्याचा अधिकारी ‘नोडल आॅफिसर’. त्यांच्या मदतीसाठी एक उपअधीक्षक. अशा घटना कुठे व कोणाकडून घडू शकतात, याच्या गुप्तवार्ता गोळा करण्यासाठी.पूर्वी अशा घटना घडल्या असतील किंवा यापुढे घडू शकतील असे जिल्हे, उपविभाग व गावे शोधून त्यांच्याकडे विशेष लक्ष.अशा संभाव्य भागांमध्ये नियमित आणि गांभीर्यपूर्वक गस्त.ज्यावरून जमावी हिंसा आणि हत्या होऊ शकतील अशी असत्य व प्रक्षोभक माहिती तसेच व्हिडिओ समाजमाध्यमांतून प्रसारित होऊ न देणे.अशी माहिती वा अफवा जे पसरवतील त्यांच्यावर कलम १५३ ए चा खटला भरून कारवाई.>घटनेनंतरचे उपायघटना घडल्यास तात्काळगुन्हा नोंदवून ‘नोडल आॅफिसर’च्या देखरेखीखाली तत्परतेने तपास.पीडितांच्या भरपाईसाठी एक महिन्यांत विशेष निधी. घटनेनंतर एक महिन्यात अंतरिम भरपाईची व्यवस्था.प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय. शक्यतो सहा महिन्यांत निकाल.इतरांना जरब बसावी यासाठी दोषींना ठरलेली जास्तीत जास्त शिक्षा.पीडित वा साक्षीदारांनी अर्ज केल्यास त्यांची नावे गुप्त ठेवण्याची व त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्था.पीडितांना विनामूल्य वकील देणे. या वकिलामार्फत खटल्याच्या विविध टप्प्यात प्रॉसिक्युटरखेरीज स्वतंत्रपणे म्हणणे मांडण्याची मुभा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय