कानपूर : उत्तर कोरियाचा नेता किम-जोंग ऊन याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे भित्तीपत्रक लावल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी एकाला अटक करून २२ जणांवर गुन्हे दाखल केले.व्यापाºयांनी लावलेल्या या भित्तीपत्रकात मोदी आणि ऊन यांची छायाचित्रे शेजारी-शेजारी असून त्यावर हिंदीत भाषेत मजकूर लिहिण्यात आला आहे. त्याचा अर्थ असा की, किमने जगाला नष्ट करण्याचा निर्णय घेतला असून मोदींनी व्यवसाय.गेल्या वर्षी नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात मोठ्या प्रमाणात छोटी नाणी आली. बँकांनी ही नाणी घ्यायला नकार दिला असून, त्याचा हे व्यापारी निषेध करीत आहेत. भित्तीपत्रकावर ज्या २२ व्यापा-यांची नावे आहेत, त्यांच्याविरोधात येथील गोविंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.भारतीय दंड संहितेचे कलम ५०५ (सार्वजनिकरीत्या खोडसाळपणा करणे) आणि १५३ (दंगल घडेल अशा हेतुने चिथावणी देणे) या कलमांखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत.व्यापाºयांनी शनिवारी म्हटले की, ‘पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्याचा आमचा हेतू नव्हता, तर छोटी नाणी स्वीकारायला बँकांनी दिलेल्या नकारामुळे आमच्या व्यवसायावर झालेल्या दुष्परिणामांकडे आम्हाला लक्ष वेधायचे होते.’ही भित्तीपत्रके चिकटवत असताना, प्रवीण कुमार अग्निहोत्री या मजुराला अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी हा राजू खन्ना असून, त्याचे छायाचित्र या भित्तीपत्रकावर आहे. तो म्हणाला की, छोट्या व्यापाºयांच्या अडचणींकडे मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे व्यवसाय बंद पडण्याच्या अवस्थेला पोहोचले आहेत. बँकांनी नाणी घ्यायला नकार दिल्यामुळे व्यापाºयांची अवस्था खूपच बिकट बनली असल्याचा दावा त्याने केला.नोटाबंदीनंतर पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध नाहीत. आमच्यासारखे छोट्या व्यापाºयांना ग्राहकांकडून अशी नाणी मिळतात, परंतु बँका त्या घेत नाहीत. आता व्यवसाय कसा करावा हे आम्हाला समजत नाही व सरकारने मोठे व्यवहार तर चेक्सद्वारेच करायचे बंधन घातले आहे, असे तो म्हणाला.
मोंदीची तुलना किम जोंगशी, २२ व्यापा-यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:49 IST