शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पितृत्व लाभल्यास ही कंपनी पुरुषांना देते दोन महिन्यांची सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:59 IST

महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचं तुमच्या ऐकिवात असेल. मात्र एका कंपनीनं चक्क पुरुषांना पितृत्व लाभल्यास 2 महिन्यांची सुट्टी देऊ केली आहे. ऐकून धक्का बसला पण हे खरं आहे. जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया या कंपनीनं पुरुषांसाठी दोन महिन्यांची पितृत्व रजा देण्याचं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली, दि. 6 - महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचं तुमच्या ऐकिवात असेल. मात्र एका कंपनीनं चक्क पुरुषांना पितृत्व लाभल्यास 2 महिन्यांची सुट्टी देऊ केली आहे. ऐकून धक्का बसला पण हे खरं आहे. जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया या कंपनीनं पुरुषांसाठी दोन महिन्यांची पितृत्व रजा देण्याचं जाहीर केलं आहे.कंपनीच्या नव्या नियमानुसार पितृत्व लाभलेली व्यक्ती 8 आठवडे म्हणजेच 2 महिन्यांची पितृत्व रजा घेऊ शकते. जॉन्सन अँड जॉन्सन  कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला कर्मचा-यांसाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा देत आली आहे. कंपनीचे एचआर हेड इंद्रजित सेनगुप्ता यांच्या मते, कर्मचा-यांच्या वैयक्तिक जीवनात आणि कामात ताळमेळ असणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे. जन्मानंतर बाळाचा खूप सांभाळ करावा लागतो. त्या दिवसांत बाळासह आईलाही आपुलकी आणि प्रेमाची आवश्यकता असते. एक पतीच स्वतःच्या पत्नीला हरेक प्रकारे मदत करू शकतो.बाळाला आंघोळ घालणं, कपडे बदलणं व मालिश करण्यासाठी पुरुष माणूस पत्नीला मदत करू शकतो. बाळ जन्माला आल्यानंतर तणावात असलेल्या पत्नीला एक नवराच तिला दिलासा देऊन मदत करू शकतो. 8 आठवड्यांची पितृत्व रजा मिळाल्यामुळे आमचे कर्मचारी जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडू शकतात, असंही कंपनीचे रिसर्च अँड डिव्हलपमेंट विभागाचे संचालक राम शुक्ला म्हणाले आहेत.