शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दोन गटांत राडा, दगडफेक-जाळपोळीच्या घटनेनंतर तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 08:47 IST

समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली.  या ठिकाणी तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत.

सध्या देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दरम्यान कर्नाटकात गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील मांड्या येथे गणेश विसर्जनाच्यावेळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये वाद झाला आणि हिंसाचाराची घटना घडली. यावेळी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ अशा घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. 

ही घटना बुधवारी रात्री म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळ घडली. गणेश विसर्जनाच्यावेळी दगडफेक आणि हिंसक हाणामारी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या दगडफेकीनंतर काही लोकांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याजवळ रात्रभर निदर्शने केली. तसेच, दगडफेक आणि मारामारीत एका पोलिसासह काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?बदरिकोप्पलु गावातील तरुण बुधवारी गणपतची विसर्जन मिरवणूक काढत होते. यावेळी मिरवणूक नागमंगलाच्या म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळून काढण्यावरून दोन गटातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे वातावरण बिघडलं आणि वाद वाढला. याचवेळी काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहने पेटवली. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. तर संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत या प्रकरणात जबाबदार असलेल्या लोकांना अटक करावी अशी मागणी केली.

सूरतमध्येही असाच प्रकार घडला होतागुजरातच्या सूरतमध्येही असाच प्रकार घडला होता. सूरतमध्ये एका गणपती मंडपावर समाजकंटकांनी दगडफेक केली होती. या घटनेनंतर संतापलेले लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी २७ जणांनाही अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Karnatakकर्नाटकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024