शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

टीआरपी प्रणालीकडे लक्ष देण्यासाठी समिती, केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 02:09 IST

TRP system : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी पत्रक काढून नवी समिती स्थापन केल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : टीआरपी घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच आता केंद्र सरकारने टीआरपी प्रणालीवर लक्ष देण्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केली आहे. प्रसारभारतीचे सीईओ शशी शंकर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची ही समिती सध्या अस्तित्वात असलेल्या टीआरपी यंत्रणेचा अभ्यास करून विश्वासार्ह आणि पारदर्शी यंत्रणा उभारण्यासंदर्भातील शिफारशी करेल. मात्र, केंद्राने नेमलेल्या या समितीला न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनने (एनबीएफ) आक्षेप घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी पत्रक काढून नवी समिती स्थापन केल्याची घोषणा केली. वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आयआयटी कानपूरचे संख्याशास्त्राचे प्राध्यापक शलभ, डीओटीचे कार्यकारी संचालक राजकुमार उपाध्याय आणि बंगळुरूतील आयआयएमचे प्राध्यापक पुलक घोष यांचा समावेश आहे. पत्रकारांसंदर्भातील गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी देशपातळीवर निष्पक्ष यंत्रणा केंद्र सरकारने उभारावी, अशी मागणी एनबीएफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, एनबीएफ ही संस्था रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गेल्या वर्षी स्थापन केली आहे आणि कथित टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, पंतप्रधानांचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा, गृह आणि माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव यांनाही या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.  

राज्य सरकार, पोलिसांचा दबाव गेल्या काही दिवसांत राज्य सरकारांकडून आणि पोलीस विभागाकडून सातत्याने टीव्ही न्यूज चॅनल्सवर दबाव आणला जात आहे, त्यात केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. यासाठी गेल्या काही आठवड्यांतील दाखलेही पत्रात नमूद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक टीव्ही आणि त्यांचे हिंदी चॅनल आर भारत यांना सूडबुद्धीची वागणूक दिली. तसेच ओडिशा सरकारने तेथील ओटीव्हीची छळवणूक केली. तर आंध्र प्रदेश सरकारनेही टीव्ही ५ विरोधात पोलीस कारवाई केली, अशा अनेक उदाहरणांचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाtrp ratingटीआरपी