शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'कमांडो' कुत्रा करणार नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:59 IST

नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण 'कमांडो' कुत्रा करणार आहे. 

नवी दिल्ली : देशात 17 सप्टेंबर रोजी आफ्रिकेतील देश नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. भारताच्या भूमीवर तब्बल 74 वर्षांनंतर चित्ता प्राणी वावरत आहेत. 74 वर्षांपूर्वी चित्ता प्राणी भारतातून नामशेष झाला होता. नामिबियातून आणलेले हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. सन 1952 मध्ये भारत देशातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले होते. चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतीय गवताळ प्रदेशातील याचा परिसंस्थेवरही परिणाम झाला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ग्रासलँड इकोसिस्टम राखण्यासाठी हे चित्ते बाहेरून आणले आहेत. चित्त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारची आहे. अशा परिस्थितीत या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार विशेष कमांडो कुत्र्यांची मदत घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी खास स्नायफर डॉग्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा कुत्रा चित्तांचे रक्षण करणार आहे. या 8 चित्त्यांना शिकारीपासून वाचवण्यासाठी कमांडोकुत्रा सज्ज झाला आहे. खरं तर असे कमांडो कुत्रे या प्रकारच्या कामासाठीच असतात. त्यांना याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

दरम्यान, 1952 साली देशात चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भारत सरकारने नामिबियातून 8 चित्त्यांची ऑर्डर दिली होती. या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी खास स्नायफर डॉग्स मागवण्यात आले आहेत. या विशेष कमांडो कुत्र्यांचे काम सर्व चित्त्यांना सुरक्षित ठेवणे आणि शिकारीपासून त्यांचे संरक्षण करणे आहे.

पाच मादी व तीन नर चित्तेनामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (CCF) या स्वयंसेवी संस्थेने दिली. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcommandoकमांडोdogकुत्रा