शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना दिलासा ! सप्टेंबर महिन्यात 200 रुपयांची नोट चलनात येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 12:15 IST

लवकरच चलनात 200 रुपयांची नोट येण्याची शक्यता आहे. 50 रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर आता लवकरच 200 रुपयांचीही नोट चलनात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

नवी दिल्ली, दि. 22 - लवकरच चलनात 200 रुपयांची नोट येण्याची शक्यता आहे. 50 रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केल्यानंतर आता लवकरच 200 रुपयांचीही नोट चलनात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 200 रुपयांच्या नवीन नोटेबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.  200 रुपयांच्या सुमारे 50 कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.  सध्या 100 रुपये ते 500 रुपयांमधील कोणतीही नोट सध्या चलनात उपलब्ध नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे असे म्हणणे आहे की, 200 रुपयांची नोट व्यवहारात आल्यास फायदेशीर ठरेल आणि यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे

दरम्यान, मोठ्या संख्येत नवीन नोट चलनात आल्यानंतर सर्वसामान्यांना काही प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सौम्य कांती घोष यांनी म्हणाले आहेत. शिवाय, 200 रुपयांची नवीन नोट चलनात आल्यास रोखीचे व्यवहार सुलभ होतील आणि एकूण चलनातील कमी मूल्याच्या नोटांचीही संख्या वाढेल, असेही घोष म्हणालेत.   एटीएममध्येही मिळणार दोनशे रूपयांची नोटदोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता. मात्र सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएममध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही. 

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली.