शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 08:33 IST

शाहीन बागेतल्या आंदोलकांची पंतप्रधान मोदींना साद

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घातली आहे. शाहीन बागेत या आणि आमच्यासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करा, असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात १५ डिसेंबरपासून दिल्लीतल्या शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं पंतप्रधानांना शाहीन बागेत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मोदींसाठी खास 'लव्ह साँग' आणि 'सरप्राईज गिफ्ट' तयार असल्याचंदेखील आंदोलकांनी सांगितलं आहे. 'पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या. तुमचं गिफ्ट घेऊन जा आणि आमच्याशी बोला,' असा मजकूर असलेले पोस्टर्स शाहीन बाग परिसरात पाहायला मिळत आहेत. 'पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा किंवा आणखी कोणीही इथे येऊन आमच्यासोबत संवाद साधू शकतात. सध्या जे काही घडतंय ते संविधानविरोधी नसल्याचं त्यांनी पटवून दिल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ,' असं शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्या सईद तासीर अहमद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. सीएएमुळे कोणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. उलट या कायद्याच्या माध्यमातून नागरिकत्व दिलं जाईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र यामुळे देशाला नेमका काय फायदा होणार आहे, हे कोणीही सांगत नाही. सीएएमुळे बेरोजगारी, गरिबी, आर्थिक मंदी हटणार आहे का, याची उत्तरं कोणीच देत नाही, असंदेखील अहमद यांनी म्हटलं. सीएए, एनआरसीविरोधात शाहीन बाग, झाकीर नगर, जामिया नगर आणि दिल्लीतल्या इतर भागांत डिसेंबरपासून आंदोलनं सुरू आहेत. शाहीन बागेतल्या आंदोलकांनी नोयडा आणि आग्नेय दिल्लीला जोडणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. या रस्त्यावरुन दररोज जवळपास पावणे दोन लाख वाहनांची ये-जा होते. या आंदोलनामुळे लाखो लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा