शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्यात सात जवान शहीद; आसाम रायफल्सच्या ऑफिसरची पत्नी, मुलगाही मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 08:01 IST

राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.

इंफाळ : लष्कराच्या ४६ आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांची पत्नी आणि सहावर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ताफ्यातील ५ जवानांना वीरमरण आले. राष्ट्रपती रामनाथ काेविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. चुराचंदपूर जिल्ह्यात शेखन-बेहिआंग पाेलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी सुमारास हा हल्ला  झाला. 

‘पीआरपीके’वर संशयमणिपूर येथील ‘पीपल्स रिव्हाॅल्युशनरी पार्टी ऑफ कंगलीपक’ या दहशतवादी संघटनेकडे संशयाची सुई आहे. मात्र, अद्याप काेणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. या भागात चार दहशतवादी गट सक्रिय आहेत. त्यांनी हल्ला केल्याचा मणिपूर पाेलिसांना संशय आहे. 

दाेषींवर लवकरच कारवाई करू : संरक्षणमंत्रीसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्वीट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, मला खूप दु:ख झाले आहे. सीओ व दोन जवानांसह देशाने पाच जवान गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. हल्ल्यातील दाेषींवर लवकरच कारवाई करू, असे राजनाथसिंह म्हणाले.

माेदींची श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. शहीद झालेले जवान व त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ट्वीट करून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ल्याचा निषेध करतानाच पंतप्रधानांवर टीका केली. देशाचे रक्षण करण्यास माेदी असमर्थ असल्याचे राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.