शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशपदासाठी नऊ जणांची कॉलेजियमकडून केंद्राला शिफारस; तीन महिला न्यायाधीश, न्या. श्रीनिवास ओक यांच्याही नावाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 05:48 IST

Supreme Court Judge : न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन हे १२ ऑगस्ट रोजी निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कमी होऊन ती २५ झाली आहे. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची पदे पूर्वीच मंजूर झाली आहेत.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने (न्यायवृंद) नऊ न्यायाधीशांच्या नावांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्या नावांमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीनिवास ओक तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांच्यासहित तीन महिला न्यायाधीशांचाही समावेश आहे.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पाच सदस्यीय कॉलेजियमने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्याही नावाची शिफारस केंद्राला केली आहे. कॉलेजियमने तीन महिला न्यायाधीशांची शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२७ मध्ये महिला न्यायाधीश या सरन्यायाधीश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावेळी ज्येष्ठता क्रमाचा विचार केला, तर न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांना हा मान मिळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन हे १२ ऑगस्ट रोजी निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कमी होऊन ती २५ झाली आहे. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची पदे पूर्वीच मंजूर झाली आहेत. १९ मार्च २०१९ रोजी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यानंतर आजतागायत सर्वोच्च न्यायालयात एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झालेली नाही. 

न्या. विक्रम नाथ, न्या. एम. एम. सुंदरेश यांचेही नावसूत्रांनी सांगितले की, गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ, सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जितेंद्रकुमार माहेश्वरी, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी. टी. व्ही. रवीकुमार, केरळ उच्च न्यायालयातील न्यायाधीश एम. एम. सुंदरेश यांच्या तसेच वरिष्ठ अधिवक्ता व माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांच्या नावांची कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यासाठी केंद्राला शिफारस केली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय