शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू हाेणार; यूजीसीकडून हिरवा कंदील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:44 IST

Colleges : पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत, असेही आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

मुंबई : दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये व शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखवला असून या संबंधित मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.  कंटेनमेंट झोन नाहीत अशा विभागांतील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावेत अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ॲप असणे बंधनकारक असेल.पहिल्या टप्प्यात संशोधक, पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करावेत, असेही आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. महाविद्यालय सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना स्वेच्छा उपस्थितीची परवानगी द्यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविद्यालयांतील एकूण विद्यार्थी संख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश द्यावेत असेही यात म्हटले आहे. 

‘एकसमान नियम करावेत’प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाले तरी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जेथे शक्य आहे तेथे निवासी महाविद्यालयांत हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली. मात्र एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी द्यावी, असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. महाविद्यालय सुरू केल्यावर जर कोणत्या विद्यार्थ्याला करोनाची लक्षणे जाणवली तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येईल अशी सुविधाही असावी आदी सूचनाही केल्या आहेत. राज्य सरकारांनी राज्यातील शिक्षण संस्थांना एकसमान नियम करावेत, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या