जगभरात गाजलेला केल्ड प्ले बँडचे सध्या भारतात कॉन्सर्ट सुरू आहेत. मुंबईत गेली काही दिवस होते. आता गुजरातमध्ये सुरू आहेत. मुंबईत हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारा ख्रिस मार्टिन याने आता भारतीयांचे पुन्हा एकदा मन जिंकले आहे. ख्रिस मार्टिन प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पोहोचला आहे.
महाकुंभहून परतले, अयोध्येला पोहोचले...! दोन दिवसांत २५ लाख भाविक; रस्तेच बंद केले
ख्रिस मार्टिन प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात स्नान करणार आहे. रविवारी त्यांच्या बँड कोल्ड प्लेने गुजरातमध्ये कॉन्सर्ट सादर केला. त्यांनी वंदे मातरम आणि माँ तुझे सलाम, ही गाणी गायली, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्लेचा भारतातील शेवटचा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी गुजरातमध्ये झाला. कोल्ड प्लेचा शो गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. मेन सिंगर ख्रिस मार्टिन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. फक्त शुभेच्छाच नाही तर ख्रिस याने वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांना चकित केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्या सगळीकडे ब्रिटीश बॅंड 'कोल्डप्ले' ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. coldplay बँड तब्बल ९ वर्षांनी भारतात परफॉर्म केला. त्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये बहुप्रतिक्षित 'coldplay' कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये 'कोल्डप्ले'चा फिव्हर संगीतप्रेमींमध्ये पाहायला मिळतो आहे.
मुंबईत मराठीमध्ये संवाद
coldplay चा मुख्य गायक क्रिस मार्टिनने मुंबईकरांसोबत मराठीत संवाद साधला. व्हिडीओमध्ये कॉन्सर्टच्या सुरुवातीला ख्रिस मार्टिन म्हणतो, कसं काय, तुम्ही सगळे ठीक आहे. तुम्ही सगळे आज छान दिसत आहात. शुभ संध्याकाळ! तुमचं सर्वांचं कॉन्सर्टमध्ये खूप खूप स्वागत. मुंबईत येऊन मला आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. इथे येऊन तुम्ही आम्हाला परफॉर्म करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद! ख्रिस मार्टिनच्या या संवादाने प्रेक्षकांचं मन जिंकलं.