शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पंजाब, हरयाणामध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:28 IST

दिल्लीमध्ये तापमान आणखी घसरले; काश्मीरमध्ये सहा व सात तारखेला जोरदार हिमवृष्टीची शक्यता

नवी दिल्ली : पंजाब, हरयाणामध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता कायम असून, दोन्ही पंजाबमधील लुधियाना येथे बुधवारी सर्वाधिक थंडी होती. दिल्लीमध्ये तापमान २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. काश्मीरमध्येही थंडीचा कडाका आणखी वाढला असून, तेथे हिमवृष्टी सुरू झाली आहे.पंजाब, हरयाणात पावसाची शक्यताहरयाणातील अंबाला, हिसार, कर्नाल येथे बुधवारी अनुक्रमे २.४, १ व ०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. लुधियाना येथे ०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमृतसर, पतियाळा येथे अनुक्रमे २.४, १.६ अंश सेल्सिअस तर पठाणकोट, आदमपूर, हलवारा, भटिंडा, फरिदकोट, गुरुदासपूर येथे ०.८, ०.४, ०.९, १.२, ३.१ अंश सेल्सिअस तापमान होते.हरयाणामध्ये अंबाला, हिसार, कर्नालमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, तेथे अनुक्रमे २.४, १, ०.६ अंश सेल्सिअस तर पंंजाब, हरयाणाची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये ३.५ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. अमृतसर, भटिंडा, हलवारा, फरिदकोट, भिवानी, सिरसा, हिसार येथे दाट धुक्यामुळे धूसर दिसत असल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. पंजाब व हरयाणामध्ये गुरुवारी व शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.लडाखमध्येही प्रचंड थंडीकाश्मीर, लडाखमध्ये बुधवारी थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून, तेथे हिमवृष्टी सुरू झाली आहे. काश्मीरच्या पठारी भागात कमी प्रमाणात व डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत आहे. येत्या ६ व ७ जानेवारीला काश्मीरमध्ये पुन्हा जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री उणे ४.४ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. काश्मीरमध्ये सर्वाधिक थंड तापमान गुलमर्गमध्ये (उणे ११.० अंश सेल्सिअस) होते.पहलगाम, काझीगुंड, कोकेरनाग, कुपवारा येथे मंगळवारी रात्री अनुक्रमे उणे ६.९, उणे ६.५, उणे ४.८, उणे ४.३ अंश सेल्सिअस तर लडाखमधील लेह शहरात उणे १३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. काश्मीरमध्ये श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील बनिहाल-रामबन परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता आहे.रेल्वेगाड्यांना उशीरदिल्लीतील तापमानाचा पारा २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने तेथील थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ झाली आहे. हवामानाच्या बदललेल्या स्थितीचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.दिल्लीत येणाऱ्या व जाणाºया २९ रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा अडीच तास विलंबाने धावत होत्या. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक सुरळीत सुरू आहे.दिल्लीतील हवेच्या दर्जाची पातळी ४३३ इतकी नोंदविण्यात आली. ती गेल्या काही दिवसांपेक्षा आणखी खालावली आहे.या शहरात अनेक ठिकाणी सकाळी दाट धुके होते.

टॅग्स :PunjabपंजाबHaryanaहरयाणाWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी