शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थंडी एवढी, की हाडे गोठली; दिल्लीमध्येही पारा ३ अंशांखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 09:07 IST

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. या हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात थंड सकाळची नोंद शनिवारी दिल्लीत झाली.

चंडीगड : पंजाब आणि हरयाणामध्ये थंडीची लाट कायम असून, अनेक ठिकाणी पारा ५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. दोन्ही राज्यांच्या अनेक भागांत सकाळी धुकेही पाहायला मिळाले. हरयाणातील नारनौल हे शनिवारी किमान ३ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वांत थंड ठिकाण होते, असे येथील हवामान विभागाच्या अहवालात म्हटले आहे. 

अंबाला येथे थंडीची चाहूल लागली असून, शहरातील किमान तापमान ६.३ अंश सेल्सिअस आहे. कर्नालमध्ये पारा ५.७ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. हिसार येथे किमान तापमान ३.६ अंश सेल्सिअस तर रोहतक, भिवानी आणि सिरसा येथे अनुक्रमे ५.४, ३.५ आणि ६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पंजाबमध्येही थंडीची लाट कमी झाली नाही. 

अमृतसर, लुधियाना आणि पतियाळा येथे अनुक्रमे ७.२, ४.९ आणि ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. गुरुदासपूरमध्ये ३.८ अंश सेल्सिअस, पठाणकोटमध्ये ६.६ , भटिंडामध्ये ४.५ , फरीदकोटमध्ये ५ आणि एसबीएसनगरमध्ये ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंडीगडमध्ये ६.८ अंश तापमान नोंदवले गेले.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. या हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात थंड सकाळची नोंद शनिवारी दिल्लीत झाली. किमान तापमान ३.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. धुक्यामुळे दिल्लीहून निघणाऱ्या किंवा पोहोचणाऱ्या १८ रेल्वे १ ते ६ तास उशिराने धावत आहेत. हरयाणाच्या हिसारमधील बलसमंद येथे किमान तापमान ०.४ अंश नोंदवले गेले. 

पाटण्यात सर्व शाळा १६ जानेवारीपर्यंत बंदउत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पारा ३.० अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, चंडीगड, हरयाणामध्ये धुके तसेच थंडीची लाट आणि दव पडण्याचा इशारा आहे. तसेच बिहारमध्ये थंडी लक्षात घेता पाटण्यात आठवीपर्यंतच्या सर्व शाळा १६ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. तसेच मधुबनी जिल्ह्यातील पाचवीपर्यंतच्या शाळा १६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :weatherहवामान