शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 05:42 IST

या जोडप्याच्या तक्रारीची दखल घेत आयआरसीटीसीने माफी मागितली आहे. 

नवी दिल्ली: आईस्क्रीममध्ये इअरबड, चिप्समध्ये बेडूक आणि विमानातील प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडल्यानंतर आता वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. भोपाळहून आग्राला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जोडप्याने आयआरसीटीसीने दिलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा आरोप केला आहे. आता या जोडप्याच्या तक्रारीची दखल घेत आयआरसीटीसीने माफी मागितली आहे. 

एक्सवर याबाबत वापरकर्त्याने या संदर्भातील तक्रार केल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला होता. तक्रार करताना म्हटले होते की, १८ जून रोजी माझे काका आणि काकी भोपाळहून आग्रा येथे जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करत होते. आयआरसीटीसीने दिलेल्या जेवणात त्यांना झुरळ आढळले. कृपया संबंधितांवर कठोर कारवाई करा आणि पुन्हा असे होणार नाही याची काळजी घ्या, असे या पोस्टमध्ये म्हटले होते.

दरम्यान, या पोस्टवर तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर दोन दिवसांनी याची आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली आहे. संबंधितांना दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे