शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राजधानी एक्स्प्रेसमध्ये लहान मुलीसाठी मागवलेल्या ऑम्लेटमध्ये सापडलं झुरळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 20:47 IST

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये योगेश मोरे नावाची व्यक्ती प्रवास करत होती. या प्रवासदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या ऑम्लेटमध्ये एक मेलेले झुरळ आढळले.

नवी दिल्ली : राजधानी एक्स्प्रेस ही देशातील सर्वात चांगली ट्रेन असल्याचे मानले जाते. मात्र या ट्रेनमधील पॅन्ट्रीच्या निष्काळजीपणामुळे भारतीय रेल्वेवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीका होत आहे. दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने मागितलेल्या ऑम्लेटमध्ये एक मेलेले झुरळ आढळल्याने टीका होत आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये योगेश मोरे नावाची व्यक्ती प्रवास करत होती. या प्रवासदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या ऑम्लेटमध्ये एक मेलेले झुरळ आढळले. यासंदर्भात योगेश मोरे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि पीएमओला टॅग करत झुरळाच्या ऑम्लेटचे फोटो शेअर केले आहेत.

दिल्ली-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेसमध्ये आपल्या कुटुंबासह प्रवास करत असताना योगेश मोरे यांना हे खराब खाद्यपदार्थ देण्यात आले. 6 डिसेंबर रोजी राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना त्यांनी सकाळी त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीसाठी अतिरिक्त ऑम्लेट मागवले होते. मात्र, ऑम्लेट आल्यावर त्यावर झुरळ दिसल्याने योगेश मोरे हैराण झाले.यानंतर हे खराब ऑम्लेट खाल्ल्यानंतर त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीला काही झाले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल योगेश मोरे यांनी ट्विटद्वारे संतापाने केला आहे. 

याचबरोबर, योगेश मोरे यांनी आपल्या तक्रारीत रेल्वे मंत्रालय तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांना टॅग केले आहे. दुसरीकडे, रेल्वे युजर्ससाठी ऑनलाइन सपोर्ट सर्व्हिस रेल्वे सेवाने (Rail Seva) योगेश मोरे यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. रेल्वे सेवाने ट्विट केले की, "गैरसोयीबद्दल क्षमस्व. सर, कृपया तुमचा पीएनआर नंबर आणि मोबाईल नंबर डायरेक्ट मेसेज करा. आयआरसीटीसी अधिकारी." दरम्यान, या प्रकरणी काय कारवाई केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, आयआरसीटीसीकडे गेल्या सात महिन्यांत ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेशी संबंधित 5,000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत ही माहिती दिली. वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की. 1 एप्रिल 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान, आयआरसीटीसीला ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत 5,869 तक्रारी आल्या. तसेच, ते पुढे म्हणाले की, "जेवणाच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास आयआरसीटीसीच्या सेवा प्रदात्यावर दंड आकारण्यासह योग्य कारवाई केली जाते."

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेfoodअन्न