शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिक पती-पत्नीमध्ये विमानातच जुंपली! जेट एअरवेजचं विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:57 IST

विमानातून प्रवास करताय आणि अचानक वैमानिकांमध्ये भांडण झालं, असं चित्र कधी तुम्ही पाहिलंय काय ? नाही ना, अशीच एक घटना लंडनहून मुंबईला येणा-या विमानात घडली आहे.

नवी दिल्ली- विमानातून प्रवास करताय आणि अचानक वैमानिकांमध्ये भांडण झालं, असं चित्र कधी तुम्ही पाहिलंय काय ? नाही ना, अशीच एक घटना लंडनहून मुंबईला येणा-या विमानात घडली आहे. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी लंडनहून मुंबईच्या दिशेनं एक विमान येत होतं. या विमानात प्रवासी नव्हे, तर चक्क पती-पत्नी वैमानिकच आपापसात भिडले आहेत.विशेष म्हणजे या वैमानिकांच्या भांडणात विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. 1 जानेवारी 2018 रोजी ही घटना घडली आहे. ज्यावेळी वा-याच्या वेगानं विमान उड्डाण करत होते, त्यावेळी या पती-पत्नी असलेल्या वैमानिकांमध्ये कॉकपिटमध्ये भांडण झालं. या विमानात 324 प्रवासी होते. त्यातील काही प्रवासी हे झोपले होते, तर काही जागे होते. जेट एअरवेजचं विमान 9डब्लू119 हे लंडनहून उड्डाण करून मुंबईत येत असतानाच या नवरा-बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला वैमानिक पाणावलेल्या डोळ्यांनी कॉकपिटच्या बाहेर येऊन रडू लागली. त्यामुळे केबिन क्रू मेंबर्सही आश्चर्यचकीत झाले. महिला वैमानिकाला अचानक का रडू कोसळलं, या प्रश्नानं सर्वच अवाक् झाले.  त्यानंतर सगळीकडे चर्चा झाल्यानंतर वैमानिक असलेल्या पती-पत्नींमध्ये भांडण झाल्याचं समोर आलं. त्या महिला वैमानिक पत्नीनं पहिल्यांदा पतीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्याच जोरजोरात कडाक्याचं भांडण झालं. परंतु त्या दोघांमध्ये भांडण झालं, त्यावेळी विमान हवेत होतं. या प्रकारानंतर DGCAनं महिला वैमानिकाचा परवाना रद्द केला आहे. तसेच या दोघांनाही कामावरून तात्पुरतं निलंबित केलं असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.