शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँका आरबीआयच्या निगराणीत; अध्यादेशाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 00:10 IST

राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब । आरबीआयकडील अधिकार वाढविले

नवी दिल्ली : सर्व सहकारी बँका आणि मल्टिस्टेट सहकारी बँका यांना रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली आणणाऱ्या बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश, २०२० ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.

याबाबत अधिकृत निवेदनात शनिवारी सांगण्यात आले की, बँकिंग नियमन कायदा, १९४९ मध्ये अध्यादेश काढून दुरुस्ती करण्यात आली आहे. ही दुरुस्ती सहकारी बँकांवरही लागू आहे. यात असेही म्हटले आहे की, या अध्यादेशाचा असा हेतू आहे की, अन्य बँकांशी संबंधित आरबीआयकडे असलेले अधिकार सहकारी बँकांपर्यंत वाढवून कामकाजात सुधारणा करणे. ठेवीदारांच्या हिताचे रक्षण या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि सहकारी बँकांना मजबूत करण्यात येणार आहे.

यात असेही म्हटले आहे की, या दुरुस्तीचा परिणाम राज्य सहकारी समितीच्या सध्याच्या अधिकारांवर होणार नाही. तसेच, कृषी पतसंस्था व सहकारी समित्यांवर ही दुरुस्ती लागू असणार नाही. कारण, यांचा उद्देश कृषी विकासासाठी दीर्घकालीन कर्ज देणे हा आहे व या संस्था बँक, बँकर व बँकिंग यासारख्या शब्दांचा वापर करीत नाहीत, तसेच चेक देत नाहीत.या निवेदनात असेही म्हटले आहे की, या अध्यादेशातून बँकिंग नियमन अधिनियमाच्या कलम ४५ मध्ये दुरुस्ती केली आहे. देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट सहकारी बँका आहेत. त्यांच्याकडे ८.६ कोटी ठेवीदारांची जवळपास ४.८५ लाख कोटी रुपयांची रक्कम आहे. पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को. ऑप. बँकेसह काही सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा समजला जात आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPresidentराष्ट्राध्यक्षbankबँक