शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Love Jihad: गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा; १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 10:39 IST

Love Jihad: गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदाराज्यपाल आचार्य देवव्रत यांची विधेयकावर स्वाक्षरी

अहमदाबाद: देशातील काही राज्यांमध्ये सक्तीने धर्मांतरण होऊ नये, यासाठी लव्ह जिहाद किंवा धर्मांतरणविरोधी कायदा करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. मात्र, आता गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यासंदर्भातील विधेयकावर स्वाक्षरी केली असून, आता याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. (gujarat to enforce love jihad law) 

गुजरातच्या विधिमंडळात मोठ्या गदारोळात पासून गुजरात धर्म स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले होते. यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावर स्वाक्षरी केली. आता १५ जून २०२१ पासून गुजरात धर्म स्वातंत्र्य (दुरुस्ती) कायदा २०२१ म्हणजेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले.

काय आहे कायदा?

गुजरातमध्ये लागू होणाऱ्या लव्ह जिहाद विरोधी कायद्यामध्ये जबरदस्ती, आमिष देऊन किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्म परिवर्तन करायला लावणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच धर्म लपवून विवाह केल्यास ५ वर्षांची शिक्षा आणि दोन लाख रुपयांचा दंड, तर अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास ७ वर्षांची शिक्षा आणि ३ लाख रुपयांचा दंड, याशिवाय कायद्याचे उल्लंघन करण्यांना ३ लाख रुपयांचा दंड आणि ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. 

शुभवर्तमान! ५० हजार स्टार्टअप कंपन्यांना केंद्र सरकारची मान्यता

अजामिनपात्र गुन्हा

या कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार, याचे उल्लंघन करण्याचा गुन्हा हा अजामिनपात्र असेल. तसेच जबरदस्तीने धर्मांतरण करण्यामध्ये मदत करणाराही तितकाच दोषी मानण्यात येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अशाच प्रकारचा कायदा आणला जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३० ऑक्टोबरला जौनपूर जिल्ह्यातील प्रचार सभेवेळी सांगितले होते की, राज्य सरकार लव्ह जिहादला रोखेल. इलाहाबाद उच्च न्यायालयानेसुद्धा एका निर्णयात म्हटले होते की, लग्नासाठी धर्मांतर करणे गरजेचे नाही. 

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादGujaratगुजरातVijay Rupaniविजय रूपाणी