शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"ममता दीदींची पंतप्रधान मोदींसोबत डील, काँग्रेसवर हल्ला चढवून खूश केलं!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:44 IST

"ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डील झाली असून, त्या केवळ पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहेत."

राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीआरपी आहेत, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. यानंतर काँग्रेसचा चांगलाच तिळपापड झाला आहे. "भाजपच राहुल गांधींना चर्चेत आणत आहे. जोवर राहुल गांधी विरोधी पक्षनेते पदावर राहतील, तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणे कठीण आहे," असे मुख्यमंत्री ममता यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डील झाली असून, त्या केवळ पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे म्हटले आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले, राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात डील झाली आहे. एएनआयसोबत बोलताना चौधरी म्हणाले, 'ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर बोलत आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी पीएम मोदी आणि दीदी यांच्यात डील झाली आहे. एवढेच नाही, तर ममता बॅनर्जींना ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांपासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे. त्यामुळेच त्या आता काँग्रेसविरोधात बोलत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूश होतील.

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी रविवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात टीएमसी कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित केले. राहुल गांधींचे नाव घेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवरही निशाणा साधला. “भाजपला संसद चालवायची नाही. त्यांना राहुल गांधींना नेता बनवायचे आहे. नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा टीआरपी राहुल गांधी आहेत. त्यांनी परदेशात केलेल्या वक्तव्याला मुद्दा बनविले जात आहे. याच बरोबर, “संसदेतील कामकाज सुरू राहावे आणि अदानी प्रकरणावर चर्चा व्हावी, एलआयसीवर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. अदानींबाबत चर्चा का होत नाही. एलआयसीवर चर्चा का होत नाही. गॅसच्या किमतीबाबत चर्चा का केल्या जात नाहीत," असे प्रश्नही ममता यांनी उपस्थित केले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी