राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

By देवेश फडके | Published: February 3, 2021 07:42 PM2021-02-03T19:42:01+5:302021-02-03T19:45:28+5:30

आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

cm mamata banerjee government probing corruption charges against former minister rajib banerjee | राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

Next
ठळक मुद्देराजीव बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जी यांचा तपास करण्याचा निर्णयममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपचा पलटवार

कोलकाता :ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी केवळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, तर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. राजीव बॅनर्जी यांचे हा निर्णय ममता बॅनर्जींसाठी खूपच धक्कादायक होता, असे मानले जात आहे. यातच आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

राजीव बॅनर्जी यांनी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. उत्तर बंगाल येथील अलीपूरद्वार जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी राजीव बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 

चोरी केली आणि भाजपमध्ये गेले

ती व्यक्ती आपल्यासोबत होती, जी आता आपल्याला सोडून गेली आहे. त्या व्यक्तीने सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेत काहीतरी गडबड केली आहे. त्याने चोरी केली आणि भाजपमध्ये गेला. मला अनेकांच्या तक्रारी आल्या आहे. याचा तपास केला जात आहे. आगमी तीन ते चार दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तरीही तपास सुरू राहील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट

भाजपचा ममता बॅनर्जींवर पलटवार

ममता बॅनर्जी यांना त्यांचे वनमंत्री राजीव बॅनर्जी भ्रष्ट आहे, तर त्यांना भाजपमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दूत का पाठवला होता, अशी विचारणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुजुमदार यांनी केली आहे. राजीव बॅनर्जी एक चांगली व्यक्ती आहे. ते एका चांगल्या कुटुंबातून आले आहेत. पश्चिम बंगालच्या जनता मुर्ख नाही. जनतेला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. राजीव बॅनर्जी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा आणि तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे त्यांना आता भ्रष्टाचारी ठरवले जात आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. राजीव बॅनर्जी यांच्यानंतर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक हलदर यांनीही तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

 

Web Title: cm mamata banerjee government probing corruption charges against former minister rajib banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.