शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:56 IST

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये मोठे नुकसान; लष्करी छावणीही वाहून गेली...

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धरालीमध्ये ढगफुटीमुळे जवळील खीरगंगा नदीला आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने प्रचंड नुकसान झाले असून, अनेक लोक बेपत्ता आहेत. या पुरात २० ते २५ हॉटेल व होम स्टे वाहून गेल्याचे वृत्त आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार चौघांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी या भागातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मनुष्यहानी किंवा वित्तहानीची आकडेवारी इतक्यात स्पष्ट होणे शक्य नाही.

या आपत्तीमध्ये मृतांचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी प्रचंड मनुष्यहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कारण, या भागात हॉटेल आणि होम स्टेमध्ये राहणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामुळे नेमके किती लोक पुरात व चिखलात दबले गेले आहेत हे कळणे तूर्त अशक्य असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.

गंगोत्री यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या धरालीमध्ये अनेक हॉटेल्स व होम स्टेमध्ये यात्रेकरूंची वर्दळ असते. मंगळवारी नदीच्या पाणलोट क्षेत्रातच ढगफुटी झाल्याने अचानक महापूर आला. यात वाहून आलेली माती व दगड-खडीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये जागोजागी डोंगरी भागात पावसामुळे गंगोत्री मार्गावर डोंगरांवरून वाहून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे रस्ते जाम झाले आहेत. अनेक भागांत मदत व बचाव पथकेच अडकून पडली आहेत. हर्षिल भागात हेलिपॅड वाहून गेले असून, लष्कराची छावणीही पाण्यात गेली आहे.

या ठिकाणी आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. बचाव पथके, लष्कर देखील सतत बचाव कार्य करत आहे. आतापर्यंत १३० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.

अचानक पाण्याचा-दगडांचा आवाज आला अन्...मुखबा गावचे प्रत्यक्षदर्शी सुभाषचंद्र सेमवाल सांगतात, दुपारी आम्ही घरात विश्रांती घेत असताना अचानक पाण्याचा खळखळाट आणि दगडांचे आवाज ऐकू आले. काही कळायच्या हॉटेल आणि इमारती या पाण्याचे कवेत घेतल्या.हे पाणी धरालीच्या दिशेने येत असल्याचे दिसताच आम्ही लोकांना सावध करण्यासाठी शिट्या वाजवणे सुरू केले, ओरडून या लोकांना लांब जाण्यास सांगितले. काही लोक हॉटेलमधून बाहेर पडून पळाले. परंतु, पाहता पाहता कित्येक घरे, लोक पुरात वाहून गेले.

आठ ते १० जवान बेपत्ता?या घटनेत हर्शिल भागातील छावणी परिसरातून भारतीय लष्कराचे आठ ते १० जवान बेपत्ता असल्याचे समजते. लष्कराचे जवान बेपत्ता झालेले असतानाही, लष्कराचे इतर जवान लोकांसाठी मदत-बचाव कार्य करण्यास सरसावले आहेत, असे भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वपक्षीय आवाहन...पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, यात दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त केली आहे. शाह यांनी या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेऊन मदतीचे आदेश दिले.

‘त्या’ भयंकर आठवणी...१६ जून २०१३ रोजी रात्री केदारनाथमध्ये आलेल्या अशाच आपत्तीत बेपत्ता ३०७५ लोकांचा आजही थांगपत्ता लागलेला नाही. याशिवाय ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेदहा वा. ऋषिगंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे विद्युत प्रकल्पाच्या कामाचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमध्ये बोगद्यात अडकलेले ११७ मृतदेह सापडले. परंतु, अजूनही ८९ जणांचे मृतदेह सापडू शकले नाही. उत्तराखंडमधील मंगळवारच्या आपत्तीमुळे या भयंकर आठवणी ताज्या झाल्या. 

टॅग्स :floodपूरSoldierसैनिक