शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवन सरल’ पॉलिसीची विक्री बंद करा, सुप्रीम कोर्टात याचिका, ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 05:35 IST

गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका गुरुवारी प्रथमच सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे आली.

नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे विकली जाणारी ‘जीवन सरल’ पॉलिसी लाभ देण्याऐवजी तोटा करून ग्राहकांची फसवणूक करणारी असल्याने या पॉलिसीची विक्री तात्काळ बंद करण्याचा आदेश द्यावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.गुंतवणुकदारांना सुजाण करण्याचे काम करणाऱ्या मुंबईतील ‘मनीलाईफ फौंडेशन’ने केलेली ही याचिका गुरुवारी प्रथमच सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे आली. मात्र याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांच्या विनंतीवरून सुनावणी १५ जुलै रोजी ठेवण्यात आली. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, पॉलिसीधारकाने ‘जीवन सरल’ पॉलिसीचे हप्ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ भरले तरी त्याला परत मिळणारी रक्कम भरलेल्या रकमेहूनही कमी असते. काही लोक गुंतवणूक म्हणून ही पॉलिसी उतरवीत असले तरी भरलेले पैसेही परत न देऊन आयुर्विमा महामंडळ ग्राहकांची फसवणूक करत आहे.याचिकाकर्त्यांचे असेही म्हणणे आहे की, आयुर्विमा महामंडळाने पुरेशी काळजी न घेता या पॉलिसीची रचना केली आहे आणि चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन महामंडळ ही पॉलिसी ग्राहकांच्या गळ््यात मारत आहे. आत्तापर्यंत महामंडळाने ही फसवी पॉलिसी विकून ७५ हजार ते एक लाख कोटी रुपये गोळा केले आहेत.यासाठी करण्यात आली याचिकाखरे तर अशी पॉलिसी बाजारात विकून न देण्याचे विमा विकास व नियामक प्राधिकरणास (इरडा) अधिकार आहेत. परंतु तक्रारी करूनही त्यांनी काही केले नाही. प्रत्येक पॉलिसीधारकास याविरुद्ध दाद मागणे शक्य नसल्याने ही प्रातिनिधिक याचिका करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय