गृहराज्य मंत्र्यांविरुद्धची एसीबी चौकशी बंद
By admin | Updated: April 11, 2015 01:40 IST
मुंबई : बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य न आढळल्याने त्याबाबतची चौकशी बंद करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला आहे. डॉ. पाटील हे त्यांच्याकडे असलेली मालमत्ता घेण्यास सक्षम असल्याचे तसेच त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही अपसंपदा नसल्याचे या चौकशीत आढळून आल्याने ही चौकशी बंद करण्यात आली आहे. या आशयाचा अहवाल लाललुचपत प्रतिबंधक खात्याकडून गृहविभागास सादर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)