शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे जगभरात वाढणार गरिबी; जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 05:15 IST

जागतिक अर्थव्यवस्थेला २०५० पर्यंत दरवर्षी ३८ लाख कोटी डॉलर्सचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढील २५ वर्षांत सुमारे १९ टक्के उत्पन्न कमी होण्याची अपेक्षा आहे. या समस्येसाठी कमीत कमी जबाबदार असलेले देश आणि हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी किमान संसाधने आहेत, असे देश यांनाही फटका बसू शकतो.

जर्मनीच्या ‘पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’मधील (पीआयके) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील सरासरी उत्पन्न २०५०मध्ये २२ टक्क्यांनी कमी होईल, असे म्हटले आहे. 

प्रगत देशांचीही सुटका नाहीया विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे येत्या २५ वर्षांत जगभरातील जवळजवळ सर्वच देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल, त्यात जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या अत्यंत विकसित देशांचाही समावेश आहे, असे शास्त्रज्ञ लिओनी वेन्झ यांनी सांगितले.

गरीब देशांना फटका जास्त- हवामान बदलासाठी सर्वांत कमी जबाबदार असलेल्या देशांना उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा ६० टक्के जास्त आणि उत्सर्जन जास्त असलेल्या देशांपेक्षा ४० टक्के जास्त उत्पन्नाचा तोटा होणार आहे. - हवामान बदलांना आळा न घातल्यास शतकाच्या उत्तरार्धात २१०० पर्यंत आर्थिक नुकसान जागतिक सरासरीच्या ६० टक्क्यांपर्यंत मोठे होईल, असे वेन्झ म्हणाले.

खर्चापेक्षा नुकसान जास्तअंदाजित नुकसान प्रचंड आहे आणि तापमान वाढ २ अंशच्या खाली ठेवण्यासाठी पुरेसे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा सहापट जास्त आहे. हे नुकसान वाढत्या सरासरी तापमानामुळे होते. तथापि, संशोधकांनी पाऊस आणि वादळ यांसारख्या इतर घटकांचादेखील विचार केला, तेव्हा अंदाजित आर्थिक नुकसान सुमारे ५० टक्क्यांनी वाढले. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था