शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

स्वच्छ भारत : कॅगने केला खोटेपणा उघड; मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 02:51 IST

२0१४ ते २0१७ या काळात आठ जिल्ह्यांतील १२0 ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली असता २९ टक्के परिवारांकडे शौचालये नसल्याचे उघडकीस आले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या दाव्यातील खोटेपणा कॅगने उघडकीस आणला आहे. आपल्या ताज्या अहवालात कॅगने म्हटले की, २0१४ ते २0१७ या काळात आठ जिल्ह्यांतील १२0 ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली असता २९ टक्के परिवारांकडे शौचालये नसल्याचे उघडकीस आले आहे.कॅगने म्हटले की, या २९ टक्के परिवारांचे सदस्य मोकळ्या मैदानात अथवा रस्त्याच्या बाजूला शौचाला बसतात. कारण या गावांत सार्वजनिक शौचालयेही उपलब्ध नाहीत. ही गुजरातमधील स्थिती आहे.दुसरीकडे वॉटर अँड प्रेक्सिस इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीजच्या अहवालात राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील खोटेपणा उघड केला गेला आहे. या राज्यांनी ज्या गावांना हगणदारीमुक्त गावे म्हणून घोषित केले होते, त्यापैकी फक्त एक गाव हगणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. सात गावांबाबतचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चच्या सर्वेक्षणात राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील हगणदारीमुक्त गावांचे दावेही खोटे असल्याचे आढळून आले. यातील फक्त एक गाव हगणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले.काँग्रेसचा हल्लाबोलमाजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले की, २0१६-१७ मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी ग्रामविकास मंत्रालयाने १४ हजार कोटींची मागणी केली होती.केंद्र सरकारने केवळ ९ हजार कोटी रुपये दिले. मंत्रालयाच्या नाराजीनंतर हा आकडा १0,५00 कोटी करण्यात आला.- २0१८ पर्यंत राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ९,८९0 कोटी रुपये खर्चच झालेले नाहीत. त्यामुळे बिगर सरकारी संस्था आक्षेप नोंदवीत आहेत. साधे पिण्याचे पाणीही सरकार पुरवू शकलेले नाही.- सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. प्रत्यक्ष काम मात्र होताना दिसत नाही. जाहिरांतीऐवजी सरकारने कामावर पैसे खर्च केले असते, तर ही स्थिती उद्भवली नसती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी