शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 07:05 IST

गाझियाबादच्या राजनगर क्षेत्रातील जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटकपूर्व जामीनशी निगडीत प्रकरणावर सुनावणी सुरू होती.

गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील एका न्यायालयात मंगळवारी पोलिस व वकिलांमध्ये तुंबळ मारहाण झाली. यात ११ हून अधिक वकील जखमी झाल्यानंतर एका स्थानिक पोलिस ठाण्याला आग लावण्यात आली.

गाझियाबादच्या राजनगर क्षेत्रातील जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास अटकपूर्व जामीनशी निगडीत प्रकरणावर सुनावणी सुरू होती. न्यायाधीश व वकिलांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मारहाणीला सुरुवात झाली. 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलया घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात पोलिस व वकील एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेनंतर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्यायाधीशांविरोधात इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणीवकिलांच्या एका समूहाने जिल्हा न्यायाधीशांविरोधात घोषणाबाजी केली. न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात १२ हून अधिक लोक जखमी झाल्याचा दावा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नाहर सिंह यादव यांनी केली.  पूर्ण घटनाक्रम स्पष्ट व्हावा यासाठी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी वकिलांनी केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केलेल्या तक्रारीवर आठ वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश