शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

By बाळकृष्ण परब | Updated: February 10, 2021 07:46 IST

Punjab Politics News : पंजाबमध्ये सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

ठळक मुद्देप्रचारादरम्यान, पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोगामधील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये झाली ही हाणामारी

मोगा (पंजाब) - पंजाबमध्ये सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान, पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले असून, यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे. Clash between Congress and Akali Dal party workers गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्याला प्राथमिक उपचारांनंतर लुधियाना येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. आता अकाली दलाच्या या जखमी कार्यकर्त्यावर लुधियानामधील डीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी मोगामधील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये झाली आहे. तिथे अकाली दलाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर वाहन चढवल्याचा आरोप होत आहे. या घटनेत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक कार्यकर्ता जखमी झाला.जखमी कार्यकर्त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्याला लुधियानाच्या डीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेदरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. या घटनेनंतर आता परिसरात तणावाचे वातावरण आहे.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलPoliticsराजकारण