शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे मराठी न्यायमूर्ती होणार सरन्यायाधीश?; रंजन गोगोईंनीच सुचवलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:01 IST

रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणूस विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस ए बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला  निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार, रंजन गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.

24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात जन्मलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरू केला. 1998 मध्ये त्यांना वरिष्ठ वकील करण्यात आले. मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही शरद अरविंद बोबडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र राष्ट्र कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे कुलपती म्हणूनही काम पाहिले आहे. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. 

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून दीर्घकाळ (523 दिवस) असणार आहेत. आतापर्यंत 46 सरन्यायाधीशांपैकी फक्त 16 जणांना 500 दिवसांचा कार्यकाळ मिळाला आहे, आता त्यात न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची गणना होईल. यापूर्वी सरन्यायाधीश कापडिया (12 मे 2010 ते 28 सप्टेंबर 12)  यांना 870 दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोई