शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

CJI DY Chandrachud: ज्या बंगल्यात वडिलांसोबत बालपण घालविले, तिथे CJI चंद्रचूड राहणार नाहीत, पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा पत्ता बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 08:40 IST

सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. सध्या ते न्यायमूर्तींच्या बंगल्यात राहत आहेत. तो बंगला छोटा पडतोय...

इतिहासात पहिल्यांदा भारताच्या सरन्यायाधीशांचा पत्ता बदलणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे लुटियंस दिल्लीच्या 19 अकबर रोड बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. चंद्रचूड हे सरन्यायाधीशांसाठी आरक्षित असलेल्या 5 कृष्ण मेनन मार्ग बंगल्यात राहणार नाहीत. कारण माजी सरन्यायाधीश यू यू लळीत हे सध्या तिथे राहत आहेत. 

लळीत यांना फेब्रुवारी अखेरीस बंगला सोडायचा आहे. यानंतर या बंगल्याची दुरुस्तीची कामे करायची आहेत. यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. यामुळे चंद्रचूड या बंगल्यात राहू शकत नाहीत. न्यायमूर्ती चंद्रचूड सध्या 14 तुघलक रोड, लुटियन्स दिल्ली येथे एका बंगल्यात राहत आहेत. 2016 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. तेव्हापासून ते या बंगल्यात राहत होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा १४ तुघलक रोड येथील बंगला खूपच छोटा आहे.

सरन्यायाधीश झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी लोकांची गर्दी असते, विविध राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींपासून ते न्यायाधीशांपर्यंत अनेक लोक येत असतात. अशा परिस्थितीत व्यवस्थापन करणे कठीण होते. तुघलक रोडच्या बंगल्यात न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य जागा देखील नाहीय. यामुळे त्यांना बंगला बदलणे भाग आहे. 

९ अकबर रोड येथील बंगला दोन मजली आहे. एका भागात कार्यालयाची जागा आहे. लळीत हे सरन्यायाधीश होण्यापूर्वी या बंगल्यात राहत होते आणि त्यादरम्यान या बंगल्यात अनेक नवीन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वायव्ही चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असताना 5 कृष्ण मेनन मार्ग बंगल्यावरच राहत होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचे 1978 ते 1985 पर्यंतचे बालपण याच बंगल्यात गेले. परंतू आता सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांना या बंगल्यात जाता येणार नाहीय. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय