शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांसोबत वाद घालणारे वकील मॅथ्यूज नेदुमपारा कोण आहेत? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:41 IST

न्यायालयात हजर असलेले वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे सातत्याने मध्ये बोलत होते. या कृतीमुळे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापले. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी परीक्षेच्या (UG NEET Exam) निकालावरील सुनावणीदरम्यान सरन्यायधीश डीवाय चंद्रचूड आणि याचिकाकर्त्यांचे वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात सुनावणी सुरू होती. त्यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा हे युक्तिवाद करत होते. यादरम्यान, न्यायालयात हजर असलेले वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे सातत्याने मध्ये बोलत होते. या कृतीमुळे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापले. 

नेमकं काय घडलं?याचिकाकर्त्याचे वकील नरेंद्र हुड्डा खंडपीठाला संबोधित करत असताना वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे मुद्दा सांगण्यासाठी उठले. यावेळी वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना शांत बसण्याच्या सूचना केल्या. पण आपण अॅमिकस म्हणजे कोर्टाचा मित्र म्हणून असल्याने बोलत आहोत असं वकील मॅथ्यूज नेदुमपारा म्हणाले. त्यावर आपण या प्रकरणात कुणालाही अॅमिकस म्हणून नियुक्त केलं नाही असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. त्यावर वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी सरन्यायाधीशांना उलट उत्तर दिलं. तुम्ही जर माझा आदर करत नसाल तर मी निघून जातो असं ते म्हणाले. 

वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांच्या या कृतीवर सरन्यायाधीश भडकले. ते म्हणाले की, तुम्ही माझं ऐका आणि शांत बसा. अन्यथा तुम्हाला सुरक्षा रक्षकांना बोलावून बाहेर काढण्यात येईल, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी ताकीद दिली. तरीसुद्धा ते थांबले नाहीत. सरन्यायाधीशांनी सुरक्षा रक्षकांना बोलावल्यानंतर वकील मॅथ्यूज नेदुमपारा म्हणाले की, मी स्वतः जातो. त्यावर सरन्यायाधीश पुन्हा म्हणाले की, मी गेल्या २४ वर्षांपासून न्यायप्रक्रियेत आहे. अशा प्रकारे कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यास मी खपवून घेणार नाही. त्यावर वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनीही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, मीही या ठिकाणी १९७९ पासून काम करतोय. तुम्ही अशा प्रकारे कुणाला बाहेर काढू शकत नाही, असं म्हणत वकील मॅथ्यूज नेदुमपारा न्यायालयाबाहेर गेले. यानंतर थोड्या वेळानं वकील मॅथ्यूज नेदुमपारा पुन्हा न्यायालयात आले आणि त्यांनी माफी मागितली. 

सरन्यायाधीशांसोबत आधीही घातला होता वाद!सर्वोच्च न्यायालयात वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांचा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याशी वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी अशा प्रकारचा वाद घातला आहे. इलेक्टोरल बाँड्स प्रकरणाच्या सुनावणीवेळीही त्यांनी अशाच प्रकारे न्यायालयामध्ये युक्तिवादामध्ये व्यत्यय आणला होता. त्यावेळीही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना चांगलंच सुनावलं होतं. 

कोण आहेत मॅथ्यूज नेदुमपारा?मॅथ्यूज नेदुमपारा हे ज्येष्ठ वकील आहेत. दिवाणी, फौजदारी, संवैधानिक, बँकिंग आणि वित्त यासह कायद्याच्या क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे. सार्वजनिक समस्यांशी, विशेषत: न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी ते त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. २०१० मध्ये, त्यांनी न्यायिक पारदर्शकता आणि सुधारणांसाठी राष्ट्रीय वकील अभियानाची स्थापना केली होती.

यापूर्वीही अडकले होते वादात!वरिष्ठ वकिलाचे नाव घेऊन न्यायाधीशांच्या मुला-मुलींना 'वरिष्ठ वकील' पद देण्यास प्राधान्य दिले जाते, असा आरोप केल्याबद्दल वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना अवमान केल्याप्रकरणी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायमूर्ती आर. न्यायमूर्ती नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठाने त्यांना अवमानासाठी दोषी ठरवले आणि ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतर त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली. पण न्यायालयाने वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांना सर्वोच्च न्यायालयात कायद्याचा सराव करण्यास एक वर्षासाठी मनाई केली होती. तसंच, वकील मॅथ्यूज नेदुमपारा हे न्यायव्यवस्थेतील नियुक्त्यांच्या कॉलेजियम पद्धतीवर टीका करण्यासाठी देखील ओळखले जातात.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय