शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:46 IST

आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.'

खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णू यांच्या खंडित मूर्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी एक टिप्पणी केली होती. यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेनेही सरन्यायाधीशांना वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता. आता यासंपूर्ण प्रकरणावर खुद्द सरन्यायाधीश बी.आर. गवई यां भाष्य केले आहे. “माझे वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले. दुसऱ्या दिवशी कुणीतरी मला सांगितले की, माझे वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो,” असे गवई म्हणाले.

सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी एका प्रकरणात सुनावणी वेळी केली. यासंदर्भात बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, आम्हाला अशा गोष्टींचा सामना रोजच करावा लागतो. अशा प्रकारे कुणालाही बदनाम करणे योग्य नाही. सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले, ‘नेपाळमध्येही अशाच गोष्टी घडल्या होत्या.’ खरे तर, मूर्तीच्या दुरुस्तीच्या मागणीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारत, ‘तुमची याचिका जनहित याचिका नाही, तर प्रचार याचिका आहे. जर तुम्ही भगवान विष्णूंचे एवढे कट्टर भक्त असाल तर मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा,’ असे म्हटले होते. त्यांच्या टिप्पणीचा हा भाग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि लोक त्यांच्यावर टीकाही करत होते.

विश्वहिंदू परिषदेची प्रतिक्रिया -यासंदर्भात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेचीही प्रतिक्रिया आली. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सरन्यायाधीशांच्या नावे एक पत्र लिहिले. या पत्रात म्हणण्यात आले आहे की, 'परवा सर्वोच्च न्यायालयात खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या दुरुस्तीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी मौखिक टिप्पणी केली, मूर्तीच्या दुरुस्तीसाठी भगवंतांकडेच प्रार्थना करा. आपण म्हणता की, आपण भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, तर आता त्यांच्याकडेच प्रार्थना करा. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे. भारतीय समाजाची न्यायालयांवर श्रद्धा आणि विश्वास आहे. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, हा विश्वास केवळ कायमच राहू नये, तर तो अधिक दृढ व्हावा.'

न्यायाधिशांनीही वाणीवर संयम ठेवायला हवा - विश्वहिंदू परिषदपुढे सल्ला देताना विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, 'आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की आपण आपल्या वाणीवर संयम ठेवायला हवा. विशेषत: न्यायालयात. ही जबाबदारी खटला लढवणाऱ्यांची आहे, वकिलांची आहे आणि तितकीच न्यायाधीशांचीही आहे. आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.'

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय