पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस जिल्हाधिकारी : सुरक्षिततेसाठी विचार
By admin | Updated: July 30, 2016 22:38 IST
जळगाव : महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ व त्यामुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस जिल्हाधिकारी : सुरक्षिततेसाठी विचार
जळगाव : महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ व त्यामुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. महामार्गावर विद्यापीठात तसेच दुसर्या बाजूला भुसावळ मार्गावर वैद्यकीय महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांसह नोकरदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे ते येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेतात. मात्र बर्याचवेळा या वाहनांचे अपघात होऊन जिवावर बेतते. याशिवाय अनेक जण स्वत:ची वाहने नेतात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांचीही संख्या वाढत आहे. हे टाळून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर शहर बस सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.