शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:58 IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला वाढता विरोध; ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं

गुवाहाटी/शिलाँग: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारताच्या बहुतांश भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आसामची राजधानी गुवाहाटीत विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिकांच्या अधिकारांना कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत राज्यातील जनतेला संबोधित केलं. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे स्थानिकांच्या परंपरा, संस्कृती, भाषा आणि जमिनीच्या अधिकारांना धक्का लागणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी चिंता करू नये. आसाम कराराच्या ६ व्या कलमांतर्गत स्थानिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यात येईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला दिला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये आंदोलनं सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर मेघालयातील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. पुढील ४८ तासांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ईशान्य भारताच्या अनेक भागांमधील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा बंद करण्यात आल्या आहेत. गुवाहाटी पाठोपाठ मेघालयाची राजधानी शिलाँगमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मेघालयातील परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्यानं मुख्यमंत्री कोनराड संगमा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. संगमा यांनी आधीपासूनच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसाम