शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:15 IST

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) अंतर्गत विमा संरक्षण २ लाखांवरून थेट ४ लाखांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

वित्त मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा प्रस्ताव विचाराधीन आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे.

विमा रक्कम दुप्पट केल्यास या योजनेत आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा ठरेल. विशेषतः अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी हा एक आर्थिक आधार ठरू शकेल. हा निर्णय सामाजिक सुरक्षेसाठी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पीएमजेजेबीवाय आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) या तब्बल ७४.६ कोटी लोकांचे कवच बनल्या आहेत. त्यामुळे देशात सर्वदूर भागात पोहोचण्यासाठी ते एक शक्तिशाली साधन बनले आहे. मात्र दुसरीकडे, ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका पीएमजेजेबीवाय योजनेच्या केवळ ३० टक्के नोंदणी लक्ष्य पूर्ण करू शकल्या आहेत. 

योजनेची साधी रचनापीएमजेजेबीवायचे वैशिष्ट्य म्हणजे योजनेची साधी रचना. वय १८ ते ५० दरम्यान असलेल्या कोणत्याही व्यक्तीला केवळ एक बँक खाते असले की, वार्षिक प्रीमियम भरून विमा मिळविता येतो. भारत सध्या परवडणाऱ्या प्रीमियमबाबत समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असताना एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ही योजना भविष्यासाठी महत्वाची ठरु शकेल.

देशाचा विमा प्रवेश (सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये विम्याचे योगदान) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४ टक्क्यांवरून ३.७ टक्क्यांवर आला आहे. जो या क्षेत्रात अधिक प्रयत्नांची गरज दर्शवितो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी