शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने राहुल गांधी शिवसेनेवर नाराज,  नाव न घेता दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 16:08 IST

महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतरही शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत.

नवी दिल्ली - सोमवारी रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत पारित झाले. या विधेयकाला भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेनेसुद्गा पाठिंबा दिला होता. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतरही शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत. त्यांनी ट्विटरवरून नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जे कुणी पाठिंबा देत आहेत ते देशाच्या मुळावर घाव घालत आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  नागरिकत्व सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध दर्शवताना राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की,''नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारताच्या संविधानावरील हल्ला आहे. जे कुणी या विधेयकाला पाठिंबा देत आहेत ते या देशाच्या मुळावर घाव घालून त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.'' या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळला असला तरी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांनी या ट्विटमधून नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. 

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक गृहमंत्री अमित शाह लोकसभेत मांडले होते. यानंतर आज (सोमवारी) रात्री नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 311 खासदार मतदान केलं. तर या विधेयकाच्या विरोधात 80 खासदारांनी मतदान केले.   दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सहजपणे पारित करून घेणाऱ्या मोदी सरकारसमोर राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित करून घेण्याचे आव्हान आहे. मात्र राज्यसभेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे हे विधेयक पारित करून घेण्यासाठी भाजपाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्यास राज्यसभेत भाजपाचा आकड्यांचा खेळ बिघडू शकतो. सध्या राज्यसभेमध्ये केंद्र सरकारला भाजपा आणि मित्रपक्षांचा मिळून 119 खासदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधामध्ये 100 सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचाही समावेश केला तर ही संख्या 103 होते. तर 19 खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना