शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

Citizen Amendment Bill: सामनातून टीका, लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेचं ठरेना; शिवसेनेची नेमकी भूमिका समजेना

By कुणाल गवाणकर | Updated: December 10, 2019 18:02 IST

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा; राज्यसभेतील भूमिकेबद्दल संभ्रम

- कुणाल गवाणकर

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेलेली शिवसेनानागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन संभ्रमावस्थेत असल्याचं दिसत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सामनामधून जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे शिवसेना हीच भूमिका कायम ठेवून राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान करेल, अशी शक्यता होती. मात्र शिवसेनेनं अचानक सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे अग्रलेखातून टीका, लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेचं ठरेना, अशा गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेना असल्याचं दिसत आहे. घुसखोरांना हाकला. नव्हे हाकलायलाच हवे, पण त्या बदल्यात इतर धर्मीय- त्यांत हिंदू बांधव आहेत- त्यांना स्वीकारण्याचं राजकारण देशात धर्मयुद्धाची नवी ठिणगी तर टाकणार नाही ना?, असा सवाल शिवसेनेनं काल सामनामधून उपस्थित केला. हिंदूंना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय दुसरा देश नाही हे मान्य, पण नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं ‘व्होट बँके’चं नवं राजकारण यातून कोणी घडवू पाहत असेल तर ते देशाच्या हिताचं नाही अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं होतं.नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे ‘व्होट बँके’चे नवे राजकारण; शिवसेनेची टीका सामनानं घेतलेली भूमिका पाहता शिवसेना लोकसभेत विधेयकाविरोधात मतदान करेल, अशी दाट शक्यता होती. सभागृहात विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील अल्पसंख्याकांचा नव्या विधेयकात समावेश करण्यात आला आहे. मग श्रीलंकेतल्या तमिळींना यामधून का वगळलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास देशाची लोकसंख्या वाढेल आणि त्याचा ताण देशाच्या साधनसंपत्तीवर पडेल, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे किती निर्वासितांना देशात स्थान देण्यात येईल? त्यामुळे देशाची लोकसंख्या किती वाढेल? श्रीलंकेतील तमिळींना यामध्ये स्थान का नाही?, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. त्यामुळे शिवसेना विधेयकाविरोधात मतदान करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं.शिवसेना लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं गेल्यानं राज्यसभेतही पक्षाचे खासदार विधेयकाला पाठिंबा देतील, अशी शक्यता निर्माण झाली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे. आमच्या शंकांचं निरसन न झाल्यास राज्यसभेत आम्ही विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'लोकसभेमध्ये काल मांडलेल्या बिलाबद्दल स्पष्टता दिसत नाही आहे, काल शिवसेनेनं आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलेली आहे', असंदेखील त्यांनी म्हटलं.उद्धव ठाकरेंच्या विधानांमुळे शिवसेनेच्या भूमिकेबद्दलचा संभ्रम आणखी वाढला आहे. सामनामधून नागरिकत्व सुधारणा विधेयक अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. लोकसभेतही शिवसेना खासदारांनी हाच पवित्रा घेतला. मात्र त्यानंतर शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. पण आता शिवसेना पक्षप्रमुखांनी विधेयकाबद्दल स्पष्टता हवी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विधेयकाबद्दल स्पष्टता नसतानाही शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान का केलं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा