सिडकोत रामनवमी उत्साहात
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नाशिक : येथील श्रीराम समर्थ अध्यात्मिक व धार्मिक प्रतिष्ठान आयोजित सालाबादप्रमाणे रामदासनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, बंटी तिदमे, उपासनी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषीकेश रामदासी, अध्यक्ष नितीन भोसले, तसेच मोलाचे सहकार्य कल्पेश जाधव, जयेश जाधव, नीलेश गायकवाड, निकेतन खैरनार, सुशील नाईक, सूरज चव्हाण, भागवत, भाऊसाहेब आदिंनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)