महाराणा प्रताप यांना सिडकोत अभिवादन
By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST
सिडको : सिडको विभागात महाराणा प्रताप युवा सेनेच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाराणा प्रताप यांना सिडकोत अभिवादन
सिडको : सिडको विभागात महाराणा प्रताप युवा सेनेच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.महाराणा प्रताप युवा सेना, दुर्गानगर, सिडको यांच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, नगरसेवक हर्षा बडगुजर, देवानंद बिरारी, नामदेव गामणे, प्रतापराव मटाले, बी. एल. श्रीवास्तव, पवन मटाले, रोशन घाटे, देवेंद्र शेलार, भगवान सूर्यवंशी, अरुण पवार, मंगलसिंग राजपूत आदिंनीही यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कॅप्शन :महाराणा युवा सेनेच्या वतीने आयोजित जयंती उत्सवात महाराणा प्रताप यांना अभिवादन करताना खासदार हेमंत गोडसे. समवेत सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, देवेंद्र शेलार आदि.