सिडकोत गॅस सिलिंडरच्या स्फोट
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
सावतानगरमधील घटना : संसारोपयागी साहित्य जळून खाक
सिडकोत गॅस सिलिंडरच्या स्फोट
सावतानगरमधील घटना : संसारोपयागी साहित्य जळून खाकसिडको : सावतानगर येथील मोती चौकात बुधवारी (दि़२६) सायंकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसून अग्निशमन विभागाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला़सावतानगर येथील मोती चौकात सुमित कर्डीले हे कुटुंबासह राहतात़ मुलाचा वाढदिवस असल्याने घरातील संपूर्ण कुटुंबिय आनंदात होते़ सायंकाळी एका बाजुला वाढदिवसाची तयारी तर दुसरीकडे तसेच आलेल्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक सुरू करणार तोच सिलिंडरने अचानक पेट घेतला व घराला आग लागली़ यामुळे घरातील मंडळींनी तत्काळ घराबाहेर पळ काढला, मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरातील वीजप्रवाह सुरुच असल्याचे दिसले़ त्यांनी तत्काळ स्वत: घरातील वीजप्रवाह बंद केला़ दरम्यान एव्हाना अग्निशामक दलाचा एक बंब घटना पोहोचला व त्यांनी आग आटोक्यात आणली़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)