शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'साठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अतिरेकी संघटना, संघ मात्र राष्ट्रवादी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:18 IST

'सीआयए'च्या या अहवालावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे.

नवी दिल्ली: अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात बजरंग दल  व विश्व हिंदू परिषद या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघटनांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मात्र सीआयएने राष्ट्रवादी संघटना म्हटले आहे. सीआयएकडून 'वर्ल्ड फॅक्टबुक' ही वार्षिक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये इतिहास, लोक, सरकार, अर्थव्यवस्था, उर्जा, भौगोलिकता, संदेशवहन, वाहतूक, लष्कर अशा 267 घटकांचा सद्यस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला आहे. यामधील राजकीय दबाव आणणाऱ्या संघटना व नेते या विभागात धार्मिक दहशतवादी संघटनांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्स या पक्षाला फुटीरतावादी म्हणून संबोधण्यात आले आहे. तर राज्यसभा खासदार मौलाना मेहमूद मदानी यांच्या उलेमा-ए-हिंद या संघटनेला धार्मिक संघटनेचा दर्जा देण्यात आलाय. तर राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाचा उल्लेख राष्ट्रवादी संघटना असा करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी RSS चा भाग असणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला मात्र दहशतवादी ठरवण्यात आले आहे. 'सीआयए'च्या या अहवालावर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. एखादी गुप्तचर संघटना आमच्या संघटनेला दहशतवादी कशी ठरवू शकते. त्यांनी हा हक्क कुणी दिला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्या जगभरात शाखा आहेत. आम्ही कधी कोणाला त्रासही दिलेला नाही. आमची संघटना राष्ट्रवादाने प्रेरित आहे. 'सीआयए'च्या या अहवालाविषयी काय करायचे याचा निर्णय आम्ही घेऊ, असे बजरंग दलाच्या नेत्यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघTerrorismदहशतवाद