शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:54 IST

यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते.

- राजेंद्रकुमारलोकमत न्यूज नेटवर्कलखनौ : प्रभू श्रीराम नगरी अयोध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण भव्य राम मंदिर किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा हे मात्र नाही. यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यामुळे ही चर्चा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयानुसार, अयोध्येतील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार आहे. कोणत्या चौकाला हे नाव द्यायचे, याचा निर्णय घेण्यासाठी अयोध्या पालिकेला १५ दिवसांचा वेळ दिला आहे.

यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते. या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली होती. भाविक जेव्हा राम मंदिर पाहण्यासाठी येतील, तेव्हा या निमित्ताने लता मंगेशकर यांच्या भजनांचेही त्यांना स्मरण होईल. 

काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ? ६ मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा अयोध्येत भगवान रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंदिराची पाहणी केली व अयोध्येच्या विकास कामांबाबत माहिती घेतली. याचवेळी ते म्हणाले होते की, अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावे चौक उभारून आश्वासनाची पूर्तता केली जाईल. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. अयोध्येत भगवान श्रीरामांचे दर्शन करणारे भाविक लता मंगेशकर यांचे नाव असलेल्या चौकातून हनुमान गढी व राम जन्मभूमीकडे जातील.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरyogi adityanathयोगी आदित्यनाथAyodhyaअयोध्या