शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

कोरस आर्टिस्ट म्हणजे संगीताचा आत्मा

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

डिसेंबरचा दुसरा रविवार जगभरात वर्ल्ड कोरस डे म्हणून साजरा केला जातो. नेहमी मुख्य गायकाच्या मागे राहून गीताला सूरमयी करणार्‍या या कलावंतांच्या वाटयाला मात्र मुख्य गायकासारचे ग्लॅमर कधीच येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन गाण्याला कोरस देणार्‍या गायक व वाद्यवृंदाच्या कलेला सलाम करण्यासाठी 20 वर्षांआधी या विशेष दिवसाची योजना करण्यात आली. कोरसशिवाय गाण्याच्या माधुर्याची कल्पनाही करवत नाही परंतु तरीही कोरस देणारे कायमच उपेक्षित राहिले आहेत. ही उपेक्षा कशी दूर करता येईल, याबाबत आपल्या शहरातील गायक/संगीतकरांना काय वाटते याचा आढावा सीएनएक्सने घेतला.

डिसेंबरचा दुसरा रविवार जगभरात वर्ल्ड कोरस डे म्हणून साजरा केला जातो. नेहमी मुख्य गायकाच्या मागे राहून गीताला सूरमयी करणार्‍या या कलावंतांच्या वाटयाला मात्र मुख्य गायकासारचे ग्लॅमर कधीच येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन गाण्याला कोरस देणार्‍या गायक व वाद्यवृंदाच्या कलेला सलाम करण्यासाठी 20 वर्षांआधी या विशेष दिवसाची योजना करण्यात आली. कोरसशिवाय गाण्याच्या माधुर्याची कल्पनाही करवत नाही परंतु तरीही कोरस देणारे कायमच उपेक्षित राहिले आहेत. ही उपेक्षा कशी दूर करता येईल, याबाबत आपल्या शहरातील गायक/संगीतकरांना काय वाटते याचा आढावा सीएनएक्सने घेतला.
संघटित गायक-समूहाने एकसुरात गावयाचा कंठसंगीताचा एक प्रकार म्हणजे कोरस. मुख्यत्वे संगीत व नाटक यांच्या प्रयोगीय कलांमध्ये समूहगानाचे विविध आविष्कार प्राचीन काळापासून दिसून येतात व ‘ा कलांतूनच समूहगानाची विविध रूपे व प्रकार विकसित होत गेले आहेत. कोरस शब्दाचे मूळ ‘ूँङ्म१ङ्म२’ (नृत्यभूमी या अर्थी) या ग्रीक संज्ञेत आढळते. समूहगान वा वृंदगान हे प्राचीन ग्रीक काळी नेहमीच नृत्याच्या साथीने केले जाई. त्यामुळे गायक-नर्तकांचा संघ व त्याने रंगमंचावर केलेले सादरीकरण, असा अर्थ कोरसला प्राप्त झाला. संगीत हिट करण्यामागे या बॅकस्टेज कलावंतांचे मोठे योगदान असते. मात्र दाद ही गायकाला मिळते. आज बोटावर मोजता येतील असेच नामांकित कोरस आर्टिस्ट लोकांना माहीत आहेत. याशिवायही असे अनेक आर्टिस्ट आहेत ज्यांच्या आवाजामुळे अनेक गीत हिट झाले आहेत. असे लोकही या दिवसाच्या निमित्ताने पुढे यावे, अशी अपेक्षा शहरातील संगती कलावंतांनी व्यक्त केली.
कोरस आर्टिस्ट संगीत क्षेत्राची शान
संगीतामध्ये ज्याप्रमाणे स्वराला ताल हवा असतो त्याच प्रमाणे गाणे श्रवणीय होण्यासाठी कोरस आर्टिस्ट हे महत्त्वाचे असतात. एका स्वर तालात गाणे पुढे घेऊन जाण्याचा मान हा त्यांना जातो. त्यांच्यामुळे एक विशेष प्रभाव संगीतावर पडतो. त्यांच्या संगतीने गातांना गायकाला मोठी मदत होते. एकात्मता दर्शविणारे हे कोरस आर्टिस्ट आज हिंदी- मराठी संगीत क्षेत्राची शान आहेत.
-सोनल अधिकारी, गायक
कमीपणा वाटू देवू नये
कोरस आर्टिस्ट हा गायका एवढाच महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे कधीही कोरसबाबतचा कमीपणा वाटू देवू नये. कोरसला वजा करा गाण्याचा आत्माच हरवून जाईल. प्रत्येक गायकाची सुरुवात ही कोरस पासूनच होते. माझ्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांना योग्य सन्मान मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. तसेच त्यांनी मेहनतीने मुख्य गायकाचे स्थान मिळवावे. - मोहन उपासनी, संगीतकार
कोरस गायकांचे भविष्य उज्वल
अनुराधा पौडवा, उषा मंगेशकर यांच्या गाण्यांना कोरस गायक म्हणून मी काम केले. आज मुख्य गायक असल्याचा मान मिळत आहे. खरं तर गीतातील भावपूर्ण प्रसंगांना व भावनांना पोषक अशी साथ कोरस आर्टिस्टमुळेच मिळते. त्यामुळे कोरस गायकांचे भविष्य उज्वल आहे, असे मला वाटते. - मीना निकम , गायक
मेहनतही हवी
कोरस गाताना मुख्य गायकाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करायला हवी. कुठलेही संगीत एका व्यक्तीमुळे निर्माण होत नाही. विविध घटकांचा त्यात समावेश असतो. कोरस ही त्यातलीच एक अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे कोरस गायिकेला कमी न लेखता मेहनत व चिकाटीने यामधून यश मिळवायला हवे. कोरस गाणारे आज मुख्य गायक झाल्याचे कित्येक उदाहरणे सांगता येतील. - संतोष जोंधळे, गायक
कोरसकडे अभ्यासुवृत्तीने बघावे
शास्त्रीय संगीतात जेव्हा आम्ही स्वरसाथ (कोरस) देतो, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद शब्दात सांगता येणार नाही. हा अभ्यासच असतो. यातून खूप काही शिकायला मिळते. त्यामुळे स्वरसाथ गाणार्‍यांनी याकडे अभ्यासुवृत्तीने बघायला हवा. कारण येथे मिळणारा अनुभव तुम्हाला मुख्य गायक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अरजित सिंग यांच्यासारख्या आघाडीच्या गायकाने कोरस गात नाव कमाविले. आज इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्रचंड महत्त्व दिले जाते.
- अमृता जाधव, गायक, संगीतकार
कोरसचा उपयोग कमी होतोय
कोरसमुळे संगीतामध्ये विविध भाव निर्माण होतात. अलीकडे मात्र कोरसचा जास्त उपयोग के ला जात नाही. ही एक शोकांतिका आहे. काही गीत असे आहेत जे कोरस विना होऊच शकत नाहीत. तसेच कोरस गाणार्‍यांमधूनच प्रतिभावंत गायक पुढे येतात. आजच्या स्थितीत बरेचसे असे गायक आहेत, जे कोरस गात प्रसिद्ध झाले आहेत.
- योगिनी दीक्षित, गायक