शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

लडाखमध्ये चिनी सैन्याने उभारले होते तंबू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:39 AM

मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिनी सैैनिक लडाखच्या दमचोक भागात घुसले होते आणि तंबूही उभारले होते. त्यानंतर ब्रिगेडस्तरीय चर्चेनंतर ते परत तर गेले मात्र, त्यांना हे आश्वासन द्यावे लागले होते की, राज्य सरकार दमचोक भागातील रस्ते निर्मितीचे काम थांबवेल. सध्या या भागात अद्यापही दोन तंबू उभारलेले आहेत.

- सुरेश डुग्गर नवी दिल्ली : मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिनी सैैनिक लडाखच्या दमचोक भागात घुसले होते आणि तंबूही उभारले होते. त्यानंतर ब्रिगेडस्तरीय चर्चेनंतर ते परत तर गेले मात्र, त्यांना हे आश्वासन द्यावे लागले होते की, राज्य सरकार दमचोक भागातील रस्ते निर्मितीचे काम थांबवेल. सध्या या भागात अद्यापही दोन तंबू उभारलेले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये चीनचे सैन्य पूर्व लडाखस्थित दमचोक सेक्टरमध्ये जवळपास ४०० मीटर आत घुसले होते. त्यांनी येथे पाच तंबू उभारले होते. असेही सांगितले जात आहे की, दोन्ही देशांत ब्रिगेडियर स्तराची चर्चा झाल्यानंतर चेरदांग- नेरलांग - नल्लान भागातील तीन तंंबू हटविण्यात आले. पण, दोन तंबू अद्यापही उभे आहेत. यात चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक राहत आहेत. भारत आणि चीनदरम्यान ४ हजार किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवळपास २३ वादग्रस्त आणि संवेदनशील भागापैकी दमचोक एक आहे. येथे सीमेची स्थिती स्पष्ट नसल्याने चीनने अनेकदा घुसखोरी केली आहे. भारतीय सैनिक येथे सदैव तत्पर असतात.लडाखमध्ये त्रिग हाइटस, दुमशेले, चुमार, स्पांगुर दर्रा आणि पांगोंग सो यांसारखे अनेक वादग्रस्त भाग आहेत. लडाखमध्ये १९९३ मध्ये फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते आणि लोकांना चीन सीमेच्या नजीकच्या भागात जाण्यास परवानगी देण्यात आली होती त्या वेळी चिनी सैन्याची घुसखोरी आणि भारतीय शेतकऱ्यांना धमकविण्याची बाब प्रथम समोर आली होती.घुसखोरी आणि अत्याचारांच्या घटना त्यापूर्वी फक्त सरकारी रेकॉर्डवरच नोंद करण्यात येत होत्या. घुसखोरीचे वृत्त अनेक महिन्यांनंतर लेह मुख्यालयात येत होते. हेही खरे आहे की, लेह फेस्टिव्हलमध्ये सहभागी पत्रकारांना पैगांग झीलसह चीन सीमेजवळच्या भागात दौरा करण्याची परवानगी प्रथमच देण्यात आली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या सीमेवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला होता. अन्यथा या भागात भारतीय सैनिक कधीतरीच दिसून येत होते. पण, चिनी सैनिक नियमित गस्त घालत होते आणि भारतीय हद्दीत आपला ताबा दाखविण्याचा प्रयत्न करत होते. लेहस्थित प्रशासकीय अधिकारी म्हणतात की, अक्साई चीनला लागून असलेल्या भागावर चीन आपला ताबा दाखवत तेथे पाय रोवू पाहत आहे.‘राजनैतिक स्तरावरच चर्चेने प्रश्न सोडवावा’डोकलाममध्ये जून २०१६ मध्ये भारत आणि चीनच्या सैैन्यात तणाव वाढला होता. त्या वेळी चीनचे सैनिक रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत होते. लडाख सेक्टरमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी कधी थांबली नाही ही वस्तुस्थिती आहे.१९६२ च्या चिनी हल्ल्यानंतर आजही घुसखोरी सुरू आहे. लडाखच्या दिशेने सैन्य आणि तोफखान्यांत भर पडत असली तरी हा प्रश्न राजनैतिक स्तरावरच चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे येथील प्रशासकीय अधिकारी सांगतात.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन