शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सरकारच्या लाल डोळ्यावर चिनी चष्मा; संसदेत विरोधी पक्षांनी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीमेवर भारत- चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संसदेत विरोधी पक्षांनी सरकारला दोन दिवसांच्या सत्रात घेरण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सीमेवर भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संसदेत विरोधी पक्षांनी सरकारला दोन दिवसांच्या सत्रात घेरण्याचा प्रयत्न केला. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ‘मोदी सरकारच्या लाल डोळ्यांवर चिनी चष्मा चढला,’ असा टोला लगावला.

खरगे यांनी केंद्र सरकारला चीनच्या आक्रमकतेवरून प्रश्न केले आहेत. भारतीय संसदेत चीनविरोधात बोलण्यास परवानगी नाही का?  मोदी सरकारच्या लाल डोळ्यांवर चिनी चष्मा चढला असे वाटते, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले असले तरी तरीही विरोधी पक्ष या मुद्द्यावर चर्चेच्या मागणीवर ठाम आहेत. गुरुवारीही काँग्रेस खासदारांनी सभागृहात चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला, तर चीनने भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊनही चीनकडून भारताची आयात वाढत असल्याचा आरोप करत लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याप्रकरणी सभागृहात श्वेतपत्रिका मांडण्याची मागणी केली. 

सदनात शून्य तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित करताना चौधरी यांनी सांगितले की, यापूर्वी दिल्लीच्या एम्सवर सायबर हल्ला झाला. चीनकडून हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. आपल्या सीमावर्ती भागात चकमक होते तेव्हा त्यावर आक्रमक भूमिका घेण्याऐवजी भारत सरकार शेजारील देशाशी आयात वाढवत आहे. सरकारचा हेतू काय आहे? आपले पंतप्रधान चीनला लाल डोळे कधी दाखवणार, असेही चौधरी म्हणाले. सभागृहात प्रत्येकी १५ मिनिटे आणि नंतर पुन्हा शून्य तासात दोन मिनिटे सभागृह तहकूब करण्यात आले. 

सरकार पळ काढतेयn दरम्यान, काँग्रेसने गुरुवारी केंद्र सरकारवर भारत-चीन सीमेवरील वादविवाद टाळल्याचा आरोप करत मोदी सरकार या मुद्द्यापासून का पळत आहे, असा सवाल केला. n काँग्रेस प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी चीनबद्दल गप्प का आहेत, असे विचारत जेव्हा ते यावर बोलतात तेव्हा ते देशाला क्लीन चिट देतात, अशी टीका केली.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनcongressकाँग्रेस