शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चीनचे संरक्षण मंत्री भारतात येणार, राजनाथ सिंह यांची भेट घेणार: गलवान घटनेनंतर पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 21:16 IST

LAC वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत.

नवी दिल्ली : LAC वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीच्या संदर्भात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठीच ते भारतात येत आहेत. यादरम्यान ते 27 एप्रिलला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार आहेत. 

चीनने एक निवेदन जारी केले

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जनरल ली यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही या भेटीसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, चीनचे स्टेट कौन्सिलर आणि संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू 27 ते 28 एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होतील. 

बैठकीदरम्यान जनरल ली परिषदेला संबोधित करतील आणि संबंधित देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनाही भेटतील. जनरल ली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील घेतील आणि दोन्ही देशातील अडथळे सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या प्रगतीवर चर्चा करतील.

कमांडर स्तरावरील बैठक सकारात्मक जनरल ली यांच्या भेटीपूर्वी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने 23 एप्रिल रोजी चुशुल-मोल्डो सीमा साइटवर झालेल्या चीन-भारत कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 18 व्या फेरीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली. सीमावर्ती भागात शांतता राखण्यासोबतच पूर्व लडाखमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडथळ्याशी संबंधित समस्यांचे निराकरण जलद मार्गी लावण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्याचे चीनने म्हटले आहे. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRajnath Singhराजनाथ सिंह