शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

डोंगलांगमधून लष्कर न हटवल्यास हुसकावून लावू, चीनची भारताला धमकी

By admin | Updated: July 5, 2017 16:05 IST

सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - सिक्कीम सीमेसंदर्भात भारतानं कडक भूमिका घेतल्यानं चीनचा तीळपापड झाला आहे. चिडलेल्या चीननं भारताला धमकावण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्करानं सिक्कीम सीमेवरून लष्कर न हटवल्यास त्यांना आम्ही हुसकावून लावू, असा धमकीवजा इशाराच चीननं भारताला दिला आहे. चीनचं सरकारी वृत्त ग्लोबल टाइम्समधून छापून आलेल्या लेखातून अशी धमकी देण्यात आली आहे. युद्ध झाल्यास भारताला 1962पेक्षा अधिक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही चीननं म्हटलं आहे. जर भारतानं सिक्कीम सीमेवर त्यांच्या भागातून लष्कर हटवलं नाही, तर आम्ही त्यांना हुसकावून लावू, असंही चीन म्हणाला आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखातून ही टिपण्णी करण्यात आली आहे. भारतीय लष्कर सन्मानासहीत सिक्कीम सीमेवरून मागे हटू शकते, अन्यथा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक त्यांनी हुसकावून लावतील, असंही लेखात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या डोंगलांग भागातून भारतीय लष्कर मागे हटल्यास दोन्ही देशांतील तणाव निवळेल, लेखात भारताविरोधात वादग्रस्त भाषेचा वापर करण्यात आला आहे. भारतानं 21व्या शतकातल्या सभ्यतेचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीमेवर आगळिकीवरून विधान जारी केलं आहे. त्यातही भारताला सिक्कीम भागातून मागे हटण्याची सूचना करण्यात आली आहे.

(सिक्कीम सीमेवर भारतीय लष्करानं वाढवली कुमक)(सिक्कीमच्या नाथू ला येथून जाणारी कैलास मानसरोवर यात्रा रद्द)

सिक्कीममधल्या डोंगलांग भागातील सीमावादावरचं भारत आणि चीनमधलं वाकयुद्ध अद्यापही सुरूच आहे. भारतानं जर चीनचं ऐकलं नाही, तर चीन स्वतःच्या सैन्याच्या ताकदीचा वापर करेल, असं एका चिनी तज्ज्ञानं यापूर्वीच सांगितलं होतं. डोंगलांगमध्ये दोन्ही देशांमधील वादाचा हा तिसरा आठवडा आहे. दोन्ही देशांमधील हा वाद योग्यरीत्या हाताळला न गेल्यास युद्धाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते, अशा इशारा चीनच्या थिंक टँकनं आधीच दिला होता.
 
भारताला समजावण्याचा चीन कसोशीनं प्रयत्न करत असून, सीमेवर शांती नांदावी यासाठी चीन कटिबद्ध आहे, असंही शांघाई अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेजचे रिसर्चर फेलो हू झियोंग म्हणाले होते. मात्र तरीही भारतानं चीनचं न ऐकल्यास चीनकडे सैन्य शक्तीचा वापर करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमुळेच भारत चीनला युद्धासाठी भडकावतो आहे. ट्रम्प यांच्या नजरेत भारत चीनशी मुकाबला करण्यासाठी कमकुवत आहे, असंही हू म्हणाले आहेत.