शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम प्रश्नावरून चीनचे लष्कर आणि राजकीय नेतृत्वामध्ये मतभेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 20:58 IST

भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत.

नवी दिल्ली, दि. ७ - भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत. विवादित भागातून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात सैन्य केवळ १५० मीटर अजून मागे आले आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यातच येत आहे. तर चिनचे राजकीय नेतृत्व मात्र हा वाद पूर्णपणे मिटवण्याच्या बाजूने आहे.  १६ जून रोजी भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमांवर वसलेल्या डोकलाम परिसरात भारत आणि चिनचे लष्कर आमने सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांपासून केवळ १५० मीटर अंतरावर उभे होते. दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी आपापले सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले होते. मात्र दोन्ही देशांचे लष्कर अजून १५० मीटर मागे येऊन उभे राहिल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे राजकीय नेतृत्व डोकमालमध्ये १६ जून पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास तयार आहे. मात्र चीनच्या लष्कराकडून त्यात खोडा घालण्यात येत आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळेच डोकलाममधून आधी भारताने माघार घ्यावी अशी अट चिनकडून घालण्यात आली होती. भारताने यावर अंमलबजावणी करताना आपल्या सैन्याच्या माघारीची सूचना चिनला दिली. मात्र चिनी सैन्याने आपल्याकडून माघारीची सूचना देण्यास उशीर केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर चिनी सैन्य मागे गेले होते. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य या प्रदेशातून पूर्णपणे माघार कधी घेईल याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.  सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर  २८ ऑगस्टला मिटला होत. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवत या वादावर पडदा टाकला होता. जून महिन्यात डोकलामवरुन वाद सुरु झाला होता.  दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली होती. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली होती. 'सुरक्षा जवानांनी चांगला संपर्क ठेवत काही दिवसांपुर्वी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे', असे भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या भेटीनंतर सांगितले होते.